Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती गाळेधारकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश ; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजेंवर जोरदार हल्लाबोल



फलटण (ता. १३ जुलै २०२५) :

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील  व्यापारी व गाळेधारकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. नवलाई मंगल कार्यालयात पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी आ रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली.या वेळी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, असत्य व कटकारस्थान तात्पुरते असते "मी सार्वजनिक जीवनात आजवर २९ गुन्ह्यांना सामोरा गेलो आहे, पण कधीच कुणासमोर झुकलो नाही. मात्र काही लोक स्वत:ला 'राजे' म्हणवून घेतात आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडून आपली जेलवारी टाळली अन्यथा आज तुम्ही जेलमध्ये असता मंत्री गोरे पुढे म्हणाले, "रामराजे यांनी सत्ता काळात सामान्य व्यापाऱ्यांवर अन्याय केला, प्रशासनाचा गैरवापर करून त्रास दिला. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर जर आज संसदेत असते, तर ते कॅबिनेट मंत्री झाले असते आणि फलटणसह संपूर्ण माढा लोकसभेचा विकास वेगाने झाला असता."



या कार्यक्रमाला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी स.अ. विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम,माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले,फलटण तालुका भाजप अध्यक्ष अमित रणवरे,विलास नलवडे,अभिजित नाईक निंबाळकर तसेच तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटणवर विशेष प्रेम आहे फलटणच्या परिवर्तनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी निधी दिला आहे गाळेधारकांच्या या प्रवेशामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारदर्शकता आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळणार आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.